Judges 8

1तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनास म्हणाली, तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेला तेव्हा आम्हाला का बोलावले नाही? असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.

2तेव्हा तो त्यास म्हणाला, तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय? 3मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे? तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.

4गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला. 5तेव्हा तो सुक्कोथांतल्या माणसांस म्हणाला, माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपाकरून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबाह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.

6तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबाह व सलमुन्ना यांच्यांवर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हाला माहित नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी? 7तेव्हा गिदोन म्हणाला, जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल तेव्हा मी रानांतल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.

8नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याचप्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथांतल्या माणसानी उत्तर दिले होते, तसेच पनुएलांतल्या माणसांनी त्याला उत्तर दिले. 9तेव्हा तो पनुएलांतल्या माणसांस असे म्हणाला, जेव्हा मी शांतीने माघारा येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.

10तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरांत होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्याच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तरवारीने पडले होते.

11तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला. 12जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाचे दोन राजे यांस पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.

13मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला. 14तेव्हा त्याने सुक्कोथांतला एक तरुण माणूस धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण माणसाने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर माणसांचे वर्णन लिहून दिले.

15मग तो सुक्कोथातल्या माणसांजवळ जाऊन बोलला, जेबाह व सलमुन्ना हे तुम्ही पाहा; याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहे काय? आम्हाला माहित नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी? 16नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानांतल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या माणसांस शिक्षा केली 17आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरांतल्या माणसांना मारून टाकले.

18मग जेबाह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती? तेव्हा ते बोलले, जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता. 19गिदोन म्हणाला, ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यास जिवंत वाचवले असते, जसा परमेश्वर जिवंत आहे, मी तुम्हाला मारले नसते.

20तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, तू उठून त्यास मार. परंतु त्या तरुणाने आपली तरवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता, म्हणून तो घाबरला. 21तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हास मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांस मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.

22तेव्हा इस्राएलातल्या माणसांनी गिदोनाला सांगितले, आम्हावर तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने राज्य करावे कारण तू आम्हाला मिद्यानाच्या सत्तेतून सोडवले आहे. 23तेव्हा गिदोन त्यास बोलला, मी तुम्हांवर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुम्हांवर राज्य करणार नाहीतर परमेश्वर तुम्हांवर राज्य करील.

24तरी गिदोन त्यास बोलला, मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे. त्यांत तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते. 25तेव्हा ते बोलले, आम्ही देतोच देतो मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यांतल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.

26आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यांनी राजांची जांभळी वस्रे याखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.

27तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यात ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले. 28मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.

29योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला. 30आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्याला पुष्कळ पत्न्या होत्या. 31आणि शखेमांत जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्याला पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.

32मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्याला अबीयेजऱ्यांच्या अफ्रास आपला पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात. 33तेव्हा असे झाले की, गिदोन मेल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बाल-बरीथ आपला देव असा करून ठेवला.

34असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यास त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही. आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्यांप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.

35

Copyright information for MarULB